“परळीत वाल्मिक कराडांची दहशत, इथं धनुभाऊंचं काहीच चालत नाही”

Rohit Pawar | परळीमधील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गिते फरार आहेत. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आहे. परळीत धनंजय मुंडेंचे मास्टरमाईंड आहेत. वाल्मिक कराड नावाचा त्यांचा कार्यकर्ता असून त्याची इथे दहशत असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही मोठे नेते आहेत.मात्र, त्यांचं इथे काहीही चालत नाही. या भागात वाल्मिक कराडची मोठी गुंडागर्दी आहे. तो कोणालााही जुमानत नाही. परळी जरी आमदार धनंजय मुंडेंची असली तरी त्यांचे त्या मतदारसंघात काहीच चालत नाही. वाल्मिक कराडचे त्या मतदार संघात चालते. असं रोहित पवार (Rohit Pawar ) म्हणाले आहेत.

रोहित पवारांचा गंभीर आरोप

इतकंच नाही तर, या वाल्मिक कराडची दहशत आता धनंजय मुंडे यांच्या हाताबाहेर गेली आहे. निवडणूक काळात ज्यांनी बूथ कॅप्चरिंगचे व्हिडीओ समोर आणले. त्यांचे जीव आता धोक्यात आहे. त्यामुळे आता हे थांबायल हवे, त्यांच्यावर कारवाई करायला हवी.अशी मागणी देखील यावेळी रोहित पवार यांनी केलीये. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते.

पिंपरी-चिंचवडच्या विकासाबाबतही रोहित पवारांनी भाष्य केलं. या भागात विकासासाठी शरद पवार यांनी निधी दिला. अजित दादांवर विश्वास दाखवत तो निधी पवार साहेबांनी दिला होता. अजित दादांनी आता फंड तिकडे दिला.लोकसभेचा निकाल बघून घाबरून 42 गावांना त्यांनी निधी दिलाय, असा टोला यावेळी रोहित पवारांनी (Rohit Pawar ) लगावला.

अजित पवारांवर रोहित पवारांचा निशाणा

तसंच राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही पार्टी बदलली नाही, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर देखील रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. “दादा भाजप सोबत गेले. पक्ष महत्त्वाचा आहे पण विचार पण महत्त्वाचा आहे. जो विचार त्यांनी 35 वर्ष जपला तो त्यांनी भाजप सोबत जाऊन सोडला.”, असं रोहित पवार म्हणाले.

“जे लोक खोटे आरोप करतात, त्यांच्याविरोधात आज ताकदीने लढण्याची गरज आहे. दादा भाजप बरोबर गेले. ज्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप केले अशा नेत्यांबरोबर दादा गेले. हे लोकांना देखील पटत नाही.”, असंही रोहित पवार (Rohit Pawar ) म्हणाले.

News Title –  Rohit Pawar on Dhananjay Munde

महत्त्वाच्या बातम्या-

पावसाबाबत हवामान खात्याचा मोठा अंदाज; ‘या’ भागात येलो अलर्ट जारी

लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “निवडणुकीआधीचा जुमला..”

वसंत मोरे ठाकरेंच्या वाटेवर?, ‘मातोश्री’वर आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट

ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट समोर!

पावसाळ्यात चिकन-मटण खाताय?, मग ही बातमी वाचाच!