पुणे महाराष्ट्र

आरोग्यविषयक नियम पाळून सरकारनं आपल्या विद्यार्थ्यांना घरी आणावं- रोहित पवार

पुणे | NEETच्या तयारीसाठी गेलेले महाराष्ट्रातील सुमारे १००० विद्यार्थी राजस्थानच्या कोटा येथे अडकून पडले आहेत, त्यांना घऱी आणण्याची मागणी होत असताना आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.

आरोग्यविषयक नियम पाळून सरकारनं आपल्या विद्यार्थ्यांना आणावं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

अन्य राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यास केंद्र सरकार सहकार्य करत नसेल व इतर राज्ये आपापल्या लोकांना बस पाठवून आणत असतील तर आपणही आपल्या लोकांसाठी मागे राहू नये, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आरोग्यविषयक नियम पाळून राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना आणावंच, अशी माझी विनंती आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानं हे विद्यार्थी कोटा येथे अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने लवकरात लवकर आपल्या घरी आणावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या