Top News महाराष्ट्र मुंबई

“घरी बसून दुसऱ्याची मापं काढली तर लोक तुम्हाला कायमस्वरूपी घरी बसवतील”

मुंबई | शेतकरी कायद्यांना विरोध करणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची कंपनी बारामती अॅग्रो करार शेती करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. भाजप नेते निलेश राणे यांनी देखील रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. निलेश राणेंच्या याच आरोपांना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माध्यमात आलेल्या बातमीची शहानिशा न करता मला नकली म्हणणाऱ्यांनी कोकणातल्या निळ्याशार समुद्राकडून पारदर्शकता आणि निखळता हा गुण घेण्याची गरज आहे. केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी आपल्या या पोस्टमध्ये करार शेतीचं समर्थन केलं आहे. मात्र शेतकरी कायदे करताना शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी यामध्ये समाविष्ट करायला हव्यात, असं मत त्यांनी मांडलं आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मी दुटप्पी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बारामती अॅग्रोचे फोटो व्हायरल झाल्यानंतर निलेश राणे यांनी रोहित पवार यांना नकली म्हटलं होतं. बारामती अॅग्रोचे व्हायरल फोटो त्यांनी आपल्या ट्विटमध्ये जोडले होते.

थोडक्यात बातम्या-

“ए शंकरपाळ्या…” महाराष्ट्राला वेड लावणारं लहान मुलांचं भांडण व्हायरल

“तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव”

शरद पवारांचं ते वक्तव्य खरं की खोटं?; राज्यपालांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

…तसा प्रयत्न केल्यास आम्ही शेतकऱ्यांचा मोर्चा रोखणार- विश्वास नांगरे पाटील

“शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रोहित पवार नक्कीच दुटप्पीपणा करत आहे आणि करत राहीन”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या