बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अत्यावश्यक सेवेतील सर्वांना मोफत सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचं रोहित पवारांकडून कौतुक, म्हणाले…

पुणे | कोरोना झाल्यानंतर लोक घाबरून जातात. एक वर्ष झालं तरी लोकं कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत. पण असे काही लोक आहेत ते या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून आले. कोरोनाबाधित रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना गरजेच्या वेळीच वाहन मिळत नसल्याचं पाहून निगडीतील राहुल शिंदे या रिक्षाचालकने विनामूल्य सेवा दिली. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्या रिक्षाचालकाचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

मोठेपण हे तुमच्याकडील संपत्तीवरून ठरत नाही तर समाजाप्रती असलेल्या दायित्वाच्या भावनेवरून ठरत असतं. पिंपरी-चिंचवड येथील रिक्षा मालक राहुल शिंदे यांनी कोरोना रुग्णांना मोफत रिक्षा सेवा देऊन आपलं मोठेपण सिद्ध केलं. त्यांच्या या कामाचा मनापासून अभिमान वाटतो. त्यांचं खूप खूप अभिनंदन!, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने कोरोना रुग्णांची तसेच नातेवाईकांची गैरसोय होताना मी पाहिलं आहे. त्यामुळे सामाजिक बांधीलकीतून पाच रिक्षाच्या माध्यमातून ही विनामूल्य सेवा आम्ही देत आहोत. डॉक्टर, नर्सेस, पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. एक रिक्षाचालक म्हणून आम्ही त्यात खारीचा वाटा उचलत आहोत, असं राहुल शिंदे या रिक्षाचालकाने सांगितलं आहे.

दरम्यान, राहुल शिंदे यांना या कामात शुभम दुबळे, रवींद्र जाधव, मनोज सुतार आणि सुधीर कांबळे या त्यांच्या मित्रांनी भक्कमपणे साथ दिली आहे. कोरोना झाल्यावर नातेवाईक धावून येत नाही तिथे अनोळखी माणूस मदतीला येतो. त्यामुळे राहूल शिंदे यांचं काम खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.

थोडक्यात बातम्या-

‘विरारमधील घटना ही काही नॅशनल न्यूज नाही’; राजेश टोपेंचं धक्कादायक वक्तव्य

“महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे”

केंद्र सरकारची बाजू मांडत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

विरार रुग्णालय दुर्घटनेबद्दल नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त; नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

कडक लॉकडाऊनसंदर्भात तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे वाचा एकाच ठिकाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More