“तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी…”; रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar | देशाचा आज अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पेत अनेक योजनांचा पाऊस पाडण्यात आला. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा हा 3.0 अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वगळले असून विरोधकांनी राज्यकर्त्यांची लायकी काढली आहे.

“…दिल्लीतील लायकी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली”

विरोधक नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. आंध्रप्रदेश आणि बिहारसाठी केंद्र सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली असल्याचा टोला रोहित पवारांनी (Rohit Pawar) लगावला आहे.

देशाच्या तिजोरीत महाराष्ट्र हे राज्य सर्वाधिक धन देणाऱ्या महाराष्ट्र राज्याला सावत्र वागणूक देणारे भाजप सरकार राज्यातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवीन प्रोजेक्ट देईल, अशी अपेक्षा असल्याचं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

दुर्देवाने आपली परंपरा भाजप सरकार जोपासत आहे. महाराष्ट्र राज्याला भोपळा मिळत आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील हवेचा अंदाज आला असेल तर तसा अहवाल हा महाराष्ट्रात येऊन गेलेल्या गृहमंत्र्यांनी दिला असेल. पवार साहेबांवर झालेले आरोप हे या हवेचे द्योतक असल्याचा रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत.

देशाचं बजेट हे केवळ बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी होतं का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी केला. त्यानंतर आता रोहित पवार यांनी देखील हल्लाबोल केला आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशमधील नेत्यांनी सरकारसोबत केलेली वाटाघाटीचं हे फळ असल्याचं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत.

“महाराष्ट्राच्या नेत्यांनी खुर्चीसाठी बार्गेनिंग न करता…”

महाराष्ट्राच्या नेत्यांनी देखील केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग न करता महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी पाठपुरावा केला असता तर, राज्यातही एखादी घोषणा झाली असल्याचं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत. या राज्याला काहीही दिलं नसले तरीही तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली.

News Title – Rohit Pawar React On Union Budget 2024

महत्त्वाच्या बातम्या

गुडन्यूज! बजेटनंतर सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त, खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी

“बजेट देशाचं की बिहार-आंध्रप्रदेशचं?”; अमोल कोल्हेंची संतप्त प्रतिक्रिया

आयकर प्रणालीत महत्वाचे बदल; तुम्हाला किती कर भरावा लागणार?

मोदी सरकारच्या बजेटमधील 10 महत्वाच्या घोषणा!

घराचं स्वप्न होणार साकार! मोदी सरकारची अफोर्डेबल हाउसिंग स्कीमवर मोठी घोषणा