“ही घराणेशाही नाही, शरद पवार आणि अजित पवारांचं कुटुंब वेगवेगळं”

Rohit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघातही पवार विजयी झाले आणि पवारांचाच पराभव झाला. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी झाल्या आणि खासदार झाल्या. मात्र त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी संधी दिली आणि बारामतीत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्या. पवारांच्या एकाच घरत पाच पद मिळाल्याचं दिसून आलं आहे.

घराणेशाहीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

एका बाजूला सुप्रिया सुळे खासदार झाल्या. दुसरीकडे सुनेत्रा पवारांना राज्यसभेचं खासदारकी पद मिळालं, तसेच शरद पवार देखील खासदार आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. तर रोहित पवार हे देखील कर्जत जामखेडचे आमदार आहेत. एकाच घरात पाच पदे ह घराणेशाही नाही का? असा सवाल रोहित पवार (Rohit Pawar) यांना केला. त्यावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की दोघांची कुटुंब ही वेगळी असल्याचं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar) दिलं.

यावेळी बोलत असताना त्यांनी अजित पवार यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. 2014 मध्ये काँग्रेसच्या सत्तेत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना खासदार केलं नाही. त्यांनी प्रफुल पटेल यांना संधी दिली होती. परंतु अजित पवार यांचा कोणत्याच लोकांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांना घरातचं खासदारकी दिली, असा हल्ला रोहित पवारांनी अजित पवारांना केला.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी पवार कुटुंबाच्या घराणेशाहीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर मलाही पद नव्हतं. सुप्रिया सुळेंना देखील देखील दीर्घकाळ पद नव्हते. परंतु अजित पवारांचा दुसऱ्यावर विश्वास नाही. म्हणून अजित पवार यांनी घरातील व्यक्तीला खासदारकी दिली. त्यांचा पक्षातील इतर कोणावर विश्वास नव्हता, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांसोबत असलेले आमदार हे लवकरच आमच्याकडे येतील. बरेच आमदार हे आमच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. ज्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. तसेच विरोधात जी लोकं फार बोलली नाहीत त्यांचा विचार केला जाईल. मात्र कोणाला घ्यायचं आणि नाही घ्यायचं याबाबत वरिष्ठ ठरवतील, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

News Title – Rohit Pawar Say Sharad pawar And Ajit Pawar Family Seperate Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार यांच्या एका ट्विटने पोलीस प्रशासन हललं, हजारो विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

प्रसिद्ध रिलस्टार सनी जाधववर बलात्काराचा आरोप; सोशल मीडियावर खळबळ

“दलित बुद्धांनो आता तरी शहाणे व्हा!”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महिलांच्या ‘या’ सवयींमुळे पतीचं आयुष्य होतं बरबाद!

“तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर…”; आदित्य ठाकरेंना ‘या’ नेत्याचं खुलं आव्हान