लंके-मारणेच्या भेटीवरून राजकारण तापलं; रोहित पवारांनी मागितली माफी

Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नेते आणि नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेंच्या भेटीसाठी गेले होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लंके-मारणे भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चारही बाजूने निलेश लंके यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी निलेश लंकेंना निवडणुकीत मदत केली म्हणून निलेश लंके भेटीसाठी गेले असल्याचा आरोप केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील नेते रोहित पवारांनी (Rohit Pawar) माफी मागितली आहे.

“निलेश भाऊंनी माफी मागितली तशीच मी देखील माफी मागतो…”

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, अहिल्यानगरचा आमदार म्हणून आणि निलेश लंकेंच्या भाऊंच्या प्रचारात प्रचारात सक्रिय असलेला कार्यकर्ता म्हणून सांगतो की, जी गोष्ट घडली आहे ती गोष्ट योग्य घडली नाही. निलेश भाऊंनी देखील माफी मागितली आहे. त्यांना त्याबाबत माहिती नव्हतं. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कोणत्याही नेत्याने कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा. कारण त्यांना लोकं फॉलो करत असतात, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत.

जसं निलेश भाऊंनी माफी मागितली तशीच मी देखील माफी मागतो. आमच्यातील एक खासदार नकळत चुकीच्या प्रवृत्तीकडे गेला. कृपा करून त्याच्यावर राजकारण करू नका, अशी विनंती रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.

निलेश लंकेंची प्रतिक्रिया

दरम्यान निलेश लंके आणि गजा मारणेंच्या भेटीनंतर निलेश लंके यांच्यावर चारही बाजूने टीका होऊ लागली. त्यावर आता निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गजा मारणेंशी झालेली भेट हा केवळ एक अपघात होता. मला गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नव्हती, असं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिलं आहे.

पुणे शहरातील गुन्हेगारीतील एक मोठं नाव कुख्यात गुंड गजा मारणे आहे. गजानन मारणेंचं मुळ गाव हे मुळशी तालुक्यातील आहे. मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून गुंड गजानन मारणेची ओळख आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पप्पू गावडे आणि अमोल बुधेंच्या खूनप्रकरणी गजा मारणेला अटक करण्यात आली होती. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षा दिली होती. त्यानंतर गजा मारणे हा पुण्यातील येरवडा येथील कारागृहात राहत होता.

News Title – Rohit Pawar Say Sorry About Nilesh Lanke Meet With Gajanan Marne

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांना किस करतानाचा मेलोनी यांचा व्हिडीओ व्हायरल!

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

‘अहंकारी झाले त्यांना प्रभू श्रीरामाने…’; आरएसएसची भाजपवर बोचरी टीका

“RSS नं ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटंही राहणार नाही”

मुकेश अंबानी देशवासीयांना देणार मोठं गिफ्ट, आता 4G-5G इंटरनेट नाही तर थेट..