बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का

अहमदनगर | भाजप नेते राम शिंदे यांना दुसरा मोठा राजकीय धक्का बसला आहे. नगरपरिषदेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

अहमदनगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांना धक्का देत जामखेड येथील भाजपचे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह 10 विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत जामखेड या राम शिंदे यांच्या पारंपरिक मतदारंसघात जात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

दरम्यान, या निवडणुकीत बाहेरचा विरुद्ध स्थानिक असाही वाद रंगला होता. मात्र अशा स्थितीतही रोहित पवार यांनी राम शिंदेंचा पराभव करत विजय खेचून आणला होता.

 ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईत आढळली कोरोनाची नवी लक्षणं; ‘ही’ लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा!

सुशांतच्या आत्महत्येला नवं वळण?; सुशांतच्या ‘या’ मैत्रिणीचा पोलीस जबाब घेणार

महत्वाच्या बातम्या-

चॅटचा ‘तो’ स्क्रीनशॉर्ट शेअर करत अर्जुन कपूरने सुशांतला वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर शक्ती कपूर यांचं रोखठोक वक्तव्य

फायनल टेस्टिंगमध्ये पोहोचलं कोरोनाचं ‘हे’ औषध, जुलैमध्ये मिळू शकते गुडन्यूज!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More