महाराष्ट्र मुंबई

‘…असा विचार करणं कितपत योग्य आहे?’; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका

File Photo

मुंबई | दोन दिवसांपूर्वी आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाला. यावरून आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

कोरोनाच्या सुरुवातीला मजूरवर्ग उन्हातान्हात चालत जाताना, नोकरदार पगाराअभावी हलाखीत जगत असताना केंद्र सरकारने मदत दिली नाही. कारण तेव्हा दिलेली मदत वाया गेली असती, असं आर्थिक पाहणी अहवालातील निरीक्षण वाचून मन सुन्न झालं, असं रोहित पवारांनी म्हटलंय.

कोरोनाचा फटका बसल्याने अर्थव्यवस्था रुळावर येण्यास किमान 2-3 वर्षे लागतील, त्यामुळे राज्यांचे आर्थिक गणित बिघडू नये, यासाठी किमान पुढील 2 ते 3 वर्षे जीएसटी भरपाईचा कालावधी वाढवून देण्याबाबतही अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी विचार करायला हवा, असं रोहित पवारांनी म्हटलंय.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी भरीव आर्थिक तरतूद केलीये.

थोडक्यात बातम्या-

सरकारचा कंपन्यांना दिलासा; पीएफसंदर्भात निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा

“निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजप निवडणूकीचा जाहीरनामा”

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण निश्चित

अर्थमंत्र्यांकडून PM आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा!

महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या