बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत आहे’; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. भाजप नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल करत अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं, असा टोला रोहित पवारांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असंही रोहित पवार म्हणालेत.

संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिलं, अशा शब्दांत रोहित पवारांनी विरोधकांना फटकारलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

नवनीत राणांचा अरविंद सावंतांवर लोकसभेत गंभीर आरोप, म्हणाल्या…

दिल्लीत दारू पिण्यासाठीची वयोमर्यादा घटवली; दिल्ली सरकारची नव्या उत्पादन शुल्क धोरणाची घोषणा

‘लेटरबाॅम्ब’ प्रकरणाला वेगळं वळण; “IPS रश्मी शुक्ला यांना देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती”- परमबीर सिंह

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; कंगणा रनौतचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मान

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More