महाराष्ट्र मुंबई

“त्या सर्वांनी तोंड न लपवता महाराष्ट्र पोलिसांची जाहीर माफी मागावी”

मुंबई | ज्यांनी सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली, त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

सुशांत सिंहची हत्या झाली नाही तर त्याने आत्महत्याच केली असल्याचा अहवाल दिल्लीच्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर ज्यांनी सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्यांनी तोंड न लपवता माफी मागावी, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

बिहार निवडणुकीसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरलं गेलं. त्यामुळं मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे, असा टोला रोहित पवारांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“क्या योगीजी के राज में महिला पोलीस नही है?”

हाथरस बलात्कारप्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी उचललं मोठं पाऊल!

“महिलांचा आवाज बनून मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी लाडकी आता गप्प का?”

अखेर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसमध्ये पीडितेच्या घरी दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या