पुरणपोळ्यांवरून राजकारण! रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला, म्हणाले…
अहमदनगर | झी मराठीच्या किचन कल्लकार या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस 30 ते 35 पुरणपोळ्या पातेलभर तुपासोबत सहज खायचे, असं म्हटलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.
मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली, असं रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने 35 मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं, असं म्हणत रोहित पवार यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.
मिसळ खाल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. ठाणे येथे भाजप मंत्री, खासदार आमदारांनी गजानन वडापाव सेंटरमध्ये कार्यकर्त्यांसोबत नाष्टा केला होता. वडापाव खाल्यानंतर पैसे न दिल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत होती. सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून रोहित पवारांनी बिल दिल्याचा टोला लगावला आहे.
दरम्यान, फुकट वडापाव खाणाऱ्यांची शहर सांभाळण्याची औकात नाही, अशी टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी 200 पेक्षा जास्त वडापाव आणि भजीपाव खाल्ले होते. त्यानंतर स्थानिक कार्यकर्ते भुजबळ यांनी बिलाचे पैसे दिले होते. तसेच अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुरणपोळ्याच्या वक्तव्यावरून रोहित पवार यांनी फटकेबाजी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्राला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?, राजेश टोपे म्हणाले…
Gold Price Today: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर
मोठी बातमी! चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांना न्यायालयाचा दणका, ‘इतक्या’ वर्षांची सुनावली शिक्षा
“राऊतांना भXXXचा अर्थ कळतो का, माझ्या बायकोला आणि आईला जाऊन…”
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता लवकरच…
Comments are closed.