अहमदनगर | महाविकास आघाडी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहे. या सरकारमध्ये सुसंवाद नाहीये. हे सरकार त्यांच्यातल्या अंर्तविरोधामुळे लवकरच कोसळेल, अशी भविष्यवाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
बोलता बोलता सरकारचे 5 वर्ष कधी पूर्ण होतील हे भाजपला कळणार पण नाही, असा टोमणा रोहित पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे. सरकार स्थापन झाल्यावर एक महिन्यात सरकार कोसळेल असे विरोधक सांगत होते, आता सहा महिने झाले आहेत, बोलता-बोलता पाच वर्षे कधी पूर्ण होतील, हे भाजपाला समजणारही नाही, असं ते म्हणाले.
सध्या करोना नियंत्रणच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तीच आमची प्राथमिकता आहे. विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा सुरळित करायची आहे तसंच जनतेचं आरोग्य आम्हाला जपायचं आहे, असं ते म्हणाले.
दुसरीकडे रोहित पवार यांनी भाजपच्या दूधदरवाढ आंदोलनाचा देखील जोरदार समाचार घेतला. श्रेय घेण्यासाठी हा आंदोलनाचा खटाटोप सुरू असल्याचं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. तसंच हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार खंबीर असल्याचं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांत आत्महत्या करूच शकत नाही; अंकिता लोखंडेनं केले अनेक धक्कादायक खुलासे
दूध दराचे श्रेय घेण्यासाठी भाजप आंदोलन करतंय- रोहित पवार
काळजी घ्या! शरीराच्या ‘या’ अवयवातही लपून बसू शकतो कोरोना व्हायरस
Comments are closed.