बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब होत नाही”

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यापासून राज्यभरात हिंदूत्वाचा नारा परत एकदा सुरू केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर जातीवादी असल्याची टीका देखील राज ठाकरेंनी केली. त्यानंतर राज्यभरात महाविकास आघाडी विरूद्ध मनसे असा सामना रंगला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपची आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी नरेटिव्ह सेट केला जातोय, असा आरोप देखील पवार यांनी राज ठाकरेंवर लावला आहे.

राज ठाकरे हे बाळासाहेबांची काॅपी करत आहेत. मात्र अंगावर शाॅल टाकली म्हणजे कुणी बाळासाहेब होत नाही, असा टोला पवार यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. मला राज ठाकरेंचं भाषण आवडायचं मात्र आता ते भाजप सांगत आहे तसं करत आहेत, असंही पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, आपण फक्त विकासाचे मुद्दे लोकांच्या समोर घेवून जाणार आहोत. सध्या विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होत नाही, अशी खंत देखील पवार यांनी बोलून दाखवली आहे. राज ठाकरेंवरील टीकेनंतर आता परत एकदा राष्ट्रवादी-मनसे नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

हार्दिकनं केल्या दांड्या गुल! सामन्यात असं काही केलं की…लाखोंचं नुकसान झालं

गायिका आशा भोसलेंचा मुलगा दवाखान्यात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

“…तर कारवाई केली जाईल”; रुपाली ठोंबरेंची थेट राज ठाकरेंवर टीका

…अन् भर पत्रकार परिषदेत शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचा माफीनामा वाचून दाखवला

“…म्हणून भाजप ठाकरे सरकारवर दबाव आणतंय”, पवारांनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More