महाराष्ट्र मुंबई

फडणवीससाहेब काळजी घ्या अन् कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा- रोहित पवार

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांनी लवकर बरे व्हावे अशा मनोकामना  राजकीय नेते व्यक्त करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीसांना सदिच्छा दिल्या आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब काळजी घ्या, आणि कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा. माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत, असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असून, मी स्वतःला वेगळे करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून फडणवीस यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातमम्या- 

भाजप मंत्र्याने मतांसाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवलं डोकं; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

प्रत्येकाला मोफत लस मिळावी, सर्व देशवासियांचा तो अधिकार आहे- अरविंद केजरीवाल

“विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा, प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करावं”

दुपारी झोपण्यावरून चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांना टोला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला, ‘या’ सरकारी रुग्णालयात घेत आहेत कोरोनावरील उपचार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या