बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा’; रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक

मुंबई | कोरोना संकटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दौरे आणि बैठका सुरु आहेत. यावरून पंकजा मुंडे यांनी पवारांचं कौतुक करत त्यांना सलाम केला. पंकजा मुंडे यांच्या या ट्विटवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा, असं म्हणत रोहित पवारांनी पंकजा मुंडे यांचं कौतुक केलं आहे.

शरद पवार साहेब, hats off… कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

‘जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला अन्यथा…’; मनसेनंतर शिवसेनेचाही आक्रमक पवित्रा

‘माझा मुलगा अवघ्या 15 मिनिटात झाला कोरोनामुक्त’; डोनाल्ट ट्रम्प यांचा अजब दावा

‘तुला थोबडवनार लवकरच, मुंबईत राहून कसं करिअर बनवतो तेच बघतो’; खोपकरांचा बिग बॉसमधील स्पर्धकाला इशारा

लवकरच मुंबईकरांसाठी लोकल सेवा होणार सुरु; ठाकरे सरकारने दिले संकेत

‘शरद पवारांनी तो प्रश्न केला आणि….’, तिकीट नाकारण्यासंदर्भात सुजय विखेंचा मोठा गौप्यस्फोट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More