महाराष्ट्र मुंबई

रोहित पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक, म्हणाले…

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 संमेलनात कोरोना ही दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगातील सर्वात मोठं आव्हान असल्याचं मतं मांडलं होतं. त्याचा संदर्भ देत आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय.

कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी जी20 संमेलनात परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सौर ऊर्जा आणि इथेनॉल निर्मिती क्षेत्रामध्ये झालेल्या कमाचं कौतुक केलं आहे. त्यासोबतच रोहित पवार यांनी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोरोना सर्वात मोठं आव्हान असून मानवाच्या इतिहासातील सर्वात महत्वपूर्ण स्थिती असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले होते. रोहित पवार यांनी याचा संदर्भ देत कोरोना संकटाची जाणीव भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही करुन द्यावी, असं आवाहन केलंय.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ व्यक्तीसोबत रोहित पवारांना लाँग ड्राईव्हला जायला आवडेल!

मुंबईकरांनो सावधान! कोरोनाच्या रूग्णांमध्ये गेल्या 4 दिवसांत लक्षणीय वाढ

महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोनाचं राजकारण करतायत; संजय राऊत यांची टीका

भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्वप्नातच ठरवावा; अनिल परब यांचा आशिष शेलारांना टोला

18 तासांच्या चौकशीनंतर भारतीचा पती हर्ष लिंबाचियाला देखील अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या