महाराष्ट्र मुंबई

सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे आपला देशच बुडायला नको- रोहित पवार

मुंबई  | सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे आपला देशच बुडायला नको, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट करत केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

सध्या भीतीचं वातावरण आहे आणि लोक सरकारवर टीका करण्यास घाबरतात, असं राहुल बजाज यांनी म्हटलंय. यावरूनच फेसबुक पोस्ट करत रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल बजाज यांच्यासारख्या ज्येष्ठ उद्योगपतींना सरकारची भीती वाटत असेल तर ही चिंताजनक बाब आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारमधील मंत्री सांगत आहेत त्याप्रमाणे बहुतेक तुम्ही चांगलं काम करत देखील असाल पण उद्योगधंद्यांची वस्तुस्थिती वेगळी आहे. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच उद्योगधंद्यांच्या खऱ्या समस्या माहित आहे, असंही रोहित पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मला एकच भीती वाटते ती म्हणजे, आपल्या वरील टिका देखील न ऐकून घेण्याच्या या सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको, असं रोहित पवारांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या