नाशिक महाराष्ट्र

मी त्यांना सांगितलं होतं, मात्र माझं कोणी ऐकलंच नाही- रोहित पवार

नाशिक | नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवन येथे रोहित पवार यांचं कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती. मात्र, स्वागत करताना फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

काही कार्यकर्त्यांनी तर तोंडाला मास्क देखील लावला नाही. यावर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं. मी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं, मात्र कोणी ऐकलंच नाही, असं रोहित पवार म्हणाले.

मी पदाधिकाऱ्यांना फिजीकल डिस्टन्सिंगबाबत सांगितलं होतं. मात्र, अनेक कार्यकर्ते इथे आले. मी सांगितलं मास्क लावा, मात्र त्यांनी ऐकलं नाही, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील रोहित पवार यांनी यावेळी बोलताना केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी”

…चांगलं काम केलं तर नोटीस मिळत नाही- देवेंद्र फडणवीस

“ईडीला आता कुणी घाबरत नाही, शरद पवार आणि ठाकरेंना नोटीस आली पुढे काय झालं?”

‘इंग्रजी विक म्हणजे….’; मराठी मुलांना अभिनेता स्वप्नील जोशीने दिला हा मोलाचा सल्ला

“कुणालाही ईडीची नोटीस मिळाली की भाजपला समोर केलं जातं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या