बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर रोहित पवारांचं ट्विट; म्हणाले…

मुंबई | जागतिक महिला दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज झालं आहे. कुणी म्हणालं वेडी कुठली, कुणी म्हणालं खुळी, असं अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे बोल आहेत. या नवीन गाण्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर प्रतिक्रिया देत त्यांचं कौतुक केलं आहे. रोहित पवारांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता फडणवीस ताई मिळालेल्या संधीचा वापर करत आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या गाण्याची निर्मिती टी-सिरीजने केली आहे. हे गाणं नाट्य संगीतावर आधारित आहे. भावनांच्या या जगतात गडबडले मी गडगडले, असा उल्लेख या गाण्यात आहे. काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतं आहे. मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या.

 

थोडक्यात बातम्या-

कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू

ममता बॅनर्जींना मोठा झटका! ‘इतक्या’ आमदारांनी तृणमूल काँग्रेसला रामराम करत केला भाजपमध्ये प्रवेश

कोरोनाकाळात देशातील 10 हजार कंपन्या बंद; महाराष्ट्रातील आकडा पाहून व्हाल थक्क!

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण!

एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या दोन तरूणांनी उचललं धक्कादायक पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More