महाराष्ट्र

कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर पवार साहेबांना आठवा- रोहित पवार

Loading...

इस्लामपूर | कोणी कितीही ताकदीचा समोर आला तर अजिबात घाबरायचं नाही. एखाद्याने जेलमध्ये टाकायची भाषा केली तर पवार साहेबांची आठवण करावी, असं वक्तव्य कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. ते इस्लामपूरमधील एका काॅलेजमध्ये बोलत होते.

साहेबांना ईडीची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. काही लोक इतिहासात राहतात पण त्यांना असं वाटायला लागलं आहे की ते नवीन युगाचे चाणक्य आहेत. मग ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात, असं म्हणत रोहित पवारांनी भाजप नेते अमित शहांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला.

Loading...

शरद पवारांना भीती दाखवू असं अहंकारी ताकदींना वाटलं मग मोठं हत्यार म्हणून ईडीला बाहेर काढलं. मग ईडीच्या चौकशीला जाण्यासाठी शरद पवार एकटे नाही तर सर्व जनता त्यांच्यासोबत आली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विचार करुन पवारसाहेब थांबले मग ईडीनेही माघार घेतली. त्यामुळे कुणीही भीती दाखवली तरी काही होत नाही असं पवारांनी म्हटलं.

माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढलो नाही. त्यामुळे विजय सत्याचा होईल, असंही रोहित पवार म्हणाले.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

पेस्ट कंट्रोलनंतर खबरदारी न घेणं जिवावर बेतलं; पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू

“उद्धवजी, राष्ट्रपुरूषांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा”

महत्वाच्या बातम्या-

Loading...

शिवरायांचा पुतळा हटवला तिथंच आता स्मारक; मुख्यमंत्री कमलनाथ करणार भूमिपूजन

शरद पवार आणि शिवसेनेनं भाजपला खिजवण्याचं काम करू नये- चंद्रकांत पाटील

पुण्यात हा काय प्रकार सुरुय?; सविताभाभी तू इथंच थांब!

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या