बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पुण्यासाठी काहीच केलं नाही त्यांचे बॅनर ‘विकासपुरूष’ म्हणून झळकतात’; पवारांचा फडणवीसांवर निशाणा

पुणे | महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडीचे मोठ्या नेत्यांमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले आहेत. मात्र या फ्लेक्सवरून राजकीय वर्तुळात टीका होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

पुण्यात जे बोर्ड वॉर चाललं आहे. ज्या व्यक्तीनं पुण्यासाठी काही केलंच नाही अशा व्यक्तीचे बॅनर भाजपानं पुण्याचे शिल्पकार म्हणून झळकावलं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच फंड आणला म्हणून काम संपलं असं होत नाही तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन  माहिती घ्यायची असती, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे.

पुण्यात ज्या प्रमुख इमारती आहेत. जिल्हा प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, ससून या महत्त्वाच्या इमारतींचं काम सुरू असताना अजित पवार सकाळी 6 वाजता भेट द्यायचे, त्याठिकाणी पाणी निट मारलंय का?, व्यवस्थित काम होतंय का?, याचा आढावा घ्यायचे. त्यावेळी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकारीही उपस्थित असायचे. उपमुख्यमंत्री, मंत्री असतानाही एवढ्या बारकाईनं त्यांनी पुण्यात काम केलं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. या फ्लेक्सबाबत बोलताना अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितले का?, गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?, चुकीचे होर्डिंग असतील तर शहरात भाजपची सत्ता आहे त्यांनी ते काढावेत, पोलिसांनी त्यावर कारवाई करावी, असं अजित पवार म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका!

“मला आता फोन करा, मी तुमच्यासाठी कपडे काढेन”; पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा!

पॉर्न प्रकरणात मोठी बातमी! राज कुंद्राने क्राईम ब्रांचला दिली इतक्या लाखांची लाच???

नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारा अपघात, चार मित्रांचा मृत्य

‘भारतरत्न पुरस्कार माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्याबरोबरीचा’; प्रसिद्ध अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More