बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘किसान सन्मान निधीचे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं ठरवलं की काय?’; पवारांचा मोदी सरकारला सवाल 

मुंबई | कोरोनाने आधीच थैमान घातल्यामुळे राज्यात लॉकडाऊन चालू आहे. या लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा चालू आहेत. बाकी इतर व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य अडचणीत सापडला आहे. अशाच प्रकारे आपल्या सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकरी अडचणीत आहे मात्र रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने त्याच्या संकटात आणखी भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचे वाढलेले दर कमी करावे म्हणून केंद्र सरकारने राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केंद्राला पत्र लिहिलं होतं.

देशातील सर्व शेतकऱ्यांना नरेंद्र मोदींनी किसान सन्मान निधीतून पैसे दिले होते. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही खतांच्या दरवाढीवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून ‘किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने व्याजासह वसूल करायचं सरकारने ठरवलं की काय?, अशी शंका येते. कोरोनाच्या काळात उद्योगांचं कंबरडे मोडून बेकारी वाढत असताना शेती हेच एकमेव क्षेत्र आहे. जे लोकांच्या जगण्याचा आधार बनलंय. अशा परिस्थितीत खतांच्या किंमती वाढवून हा आधारही सरकारने काढून घेऊ नये आणि या वाढीव किंमती तातडीने कमी कराव्यात, ही विनंती, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रासायनिक खतांच्या किंमतीत झालेली वाढ अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. बऱ्याच खतांच्या किंमतीत 700 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी दादा भुसे यांनी केंद्राला केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

माणुसकी हरवली! रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ, पत्नीने दिला पतीला अग्नी 

“भारतात कोरोनाच्या आणखी बऱ्याच लाटा येणार, पुढील 6 ते 18 अत्यंत महत्त्वाचे”

अमृता फडणवीसांच्या त्या ट्विटला रूपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या….

“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”

मला सेक्स करायला जाण्यासाठी ई-पास हवाय; तरुणाच्या अर्जाने पोलीस हैराण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More