मुंबई | अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं सोयाबीन, ऊस, कडधान्य आणि भातशेतीला फटका बसला. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. हातातोंडाशी आलेला घास हिसकवून घेतल्यासारखी अवस्था शेतकऱ्यांची झाली. अशातच केंद्राने पथक आता पाहणीसाठी आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे ‘पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं’, असला प्रकार असल्याचं म्हणत रोहित पवारांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करू नये! आता पथक नको मदत पाठवा!, असंही पवारांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवारांच्या आधी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राज शेट्टी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
दरम्यान, शेतकऱ्यांनी खासगी सावकराकडून पैसे घेऊन जमीनीची साफ सफाई करून हरभरा ज्वारीची पेरणी केली आहे. या पिकाकडे बघून पथक म्हणेल “फसल तो बहुत अच्छी है “ इनको मदत करने कि जरूरत नही, असं म्हणत शेट्टी यांनी म्हटलं आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे…
‘पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं’, असला प्रकार आहे.
केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करू नये!
आता पथक नको मदत पाठवा!@PMOIndia— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 21, 2020
थोडक्यात बातम्या-
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची 6 तास चौकशी
“भाजप सोडून कोणीही जाणार नाही, काहीजण उगाचच वावड्या उठवतात”
ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी शरद पवार पश्चिम बंगालला जाणार- नवाब मलिक
मोठी बातमी! महाराष्ट्रात उद्यापासून ‘इतके’ दिवस राहणार रात्रीची संचारबंदी- मुख्यमंत्र्यांचा निर्णय
‘असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं’; राजू शेट्टींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा