बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्याला पुरेशी लस कशी मिळेल यासाठी केंद्राला पत्र जरूर लिहावं”

मुंबई | मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे. हे प्रकार तत्काळ थांबवण्यात यावेत, अशी मागणी करणारं पत्र विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याला लिहिलं होतं. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना टोला हाणला आहे.

कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही, त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुया, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने होतो आहे. मुंबईसारख्या शहरात जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता किमान 1 लाख इतकी आहे. तेथे केवळ सरासरी 34,191 इतक्याच चाचण्या प्रतिदिन केल्या जात असल्याचं फडणवीस म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी उद्यापासून 3 दिवसांची सुट

आयपीएल गाजवलेल्या युवा खेळाडूवर दु:खाचा डोंगर; भावाच्या आत्महत्येनंतर वडिलांचं कोरोनाने निधन

“शिवसेनेसारखं इतरांना जमलं नाही, म्हणून आज अनेक राज्यांमध्ये चिता पेटलेल्या दिसत आहेत”

मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

“रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More