Top News जळगाव महाराष्ट्र

शेतकरी कुठलाही असो त्यांना सन्मानाची वागणूक द्या- रोहित पवार

जळगाव | महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक असो की तामिळनाडू असो शेतकरी हा शेतकरी असतो त्यांना सन्मानाची वागणूक द्या अशी मागणी कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील कजगाव येथे रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. डॉ.भूषण मगर यांच्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचं रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

शेतकरी आंदोलन सुरु झाले त्यावेळी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. रस्ते खोदण्यात आले या चुकीच्या गोष्टी आहेत अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान,  येत्या 26 जानेवारीला होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे का?, असा सवाल रोहित पवारांनी केला यावर पवार म्हणाले, हे माहिती नाही. मात्र शरद पवार यांचा 26 जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

…त्यांनी बिबट्यालाही सोडलं नाही; शिजवून खाल्लं!

‘…तर मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; प्रवीण दरेकरांचा सरकारला इशारा

फक्त ‘जय हिंद’ किंवा ‘जन गण मन’ म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नाही- व्यंकय्या नायडू

‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

“एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या