बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही”

मुंबई | राज्याता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोणाग्रस्त रूग्णांची रोजची आकडेवारीही मोठ्या संख्येने वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे तर काही ठिकाणी कर्फ्यू लावला आहे. मात्र या निर्णयाला स्थानिक नागरिक, व्यापारी यांच्याकडून विरोध  होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

लॉकडाऊनच्या भितीने अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांमध्ये संभ्रमाची भावना आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पर्याय नसून लसीकरणाबरोबर लोकांनी कटिबध्दपणे नियमांचे पालन करणं गरजेचंय, लॉकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणारं नाहीये, असं मला वाटतं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी लॉकडाऊनला विरोध केला नसला तरी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेतील सर्व घटक म्हणजे व्यापारी, व्यावसायिकांमध्ये संभ्रमाची भावना असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे रोहित पवांरानी नागरिकांना लॉकडाऊन टाळायचं असेल तर कोरोनाच्या नियमांचं पालन करायला हवं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  राज्याची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यात दिवसेंदिवस गंभीर परिस्थीत होत चालली आहे. या शहरांमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालीय. राज्यात दिवसभरात तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील 1962, पुण्यातील 1740 तर नागपुरातील 2252 नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

इशान किशनचं धूमधडाक्यात पदार्पण, भारताचा इंग्लंडवर दमदार विजय

जखमी वाघिण जास्त घातक असते- ममता बॅनर्जी

आम्हाला आणखी पाच वर्षे द्या घुसखोरी पूर्णपणे संपवू- अमित शहा

“राजकारणात काहीही होऊ शकतं नाना पटोलेसुद्धा आमच्याकडे येऊ शकतात”

शरद पवारांनी केेलेल्या ‘त्या’ भाकीतावर देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More