Top News महाराष्ट्र मुंबई

राम कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांनी साधला निशाणा, म्हणाले…

मुंबई | भाजपचे आमदार राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी एका पोलिसाला केलेल्या मारहाणीनंतर त्यांना सोडवण्यासाठी कदमांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन केला. त्यांच्या फोनवरील संभाषणची क्लिप व्हायरल झाली आहे. यावरूव राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कदमांवर टीका केली आहे.

मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यांच्या बाजूने भाजपच्या नेत्यांनी यापूर्वी आंदोलन केलं. आता मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करू नका, म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. यावरुनच यांची विचारसरणी कशी आहे, हे लोकांना समजतंय. यापलीकडं आपण काय बोलणार?, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

राम कदम यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेने कदमांविरोधात निषेध मोर्चा काढला. भाजप कार्यकर्त्यांची मानसिकता ही गुंड प्रवृत्तीची असल्याचं युवासेनेने म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेना यांच्यात संघर्ष चालू होता तेव्हा कदमांनी कंगणाला पाठिंबा दर्शवला होता.

 

थोडक्यात बातम्या-

“आमच्याविरूद्ध तीन पैलवान एकत्र आले तरी आम्ही पुणे महानगरपालिका जिंकू”

धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांना पत्र

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर नवाब मलिक म्हणाले…

“…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही”

“मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या