अहमदनगर | ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रोहित पवार यांनी तीस लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. हे बक्षीस म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारं असल्याचा आरोप भाजप नेते राम शिंदेंनी रोहित पवारांवर केला होता. याला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एखाद्या गावात ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल तर ती झाल्यावर त्या गावासाठी विकास निधी देऊ असं म्हटल्यास यात काय चुकीचं आहे. त्यांना असं वाटलं असेल की, वेगळ्या पद्धतीने पैसे वाटले जातील. तर तसं काही नाही. त्यांना चुकीचं वाटलं आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
राम शिंदेंना विकासाचं काम कळत नसेल. गट-तट कळत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. ते काय बोलतात यापेक्षा लोकांना काय पाहिजे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याच हेतूने मी यापुढेही काम करत राहणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पवारांच्या टीकेवर राम शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
दहावी-बरावीच्या बोर्ड परीक्षांच्या आज तारखा जाहीर होणार!
ग्रामपंचायत निवडणुकीची ‘ही’ पद्धत लोकशाहीला घातक- हसन मुश्रीफ
सरकारला कंटाळून डीजीपींनी प्रतिनियुक्तीवर जाणं भूषणावह नाही- देवेंद्र फडणवीस
पुणेकरांच्या आनंदावर विरजण; रात्री 11 नंतर मिळणार नाही खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी
मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे भव्य कलादालन साकारा- उद्धव ठाकरे