बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊन संपेपर्यंत महाराष्ट्रालाच आपलं घर समजा; रोहित पवारांचं राज्यातल्या परप्रांतीयांना आवाहन

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना दिल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला. त्यामुळे राज्यातील परप्रांतीय मजूर लोक अडकून पडले. मजुरांनी वांद्रे पश्चिममध्ये भागात बस डेपोजवळ एकत्र येऊन गावाकडे परत जाण्यासाठी हट्ट केला. जमावबंदी असताना एकत्र येणं म्हणजे कोरोनाला खतपाणी घातल्यासारखं आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी परप्रांतीय मजुरांना कुठेही न जाण्याचं आवाहन केलं आहे.

मी महाराष्ट्रात राहणाऱ्या भारतातील इतर राज्यांतील आमच्या भावंडांना आश्वासन देतो की आपले सरकार आणि आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी एकमेकासह उभे आहोत. आज संपूर्ण देश या संकटात एक झाला आहे. त्यामुळे सर्वांनी सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे.

जर तुमची काळजी घेण्यात आम्ही कुठे कमी पडत असलो तर लवकरात लवकर आम्ही त्या गोष्टीची पुर्तता करू. तुम्ही संयम ठेवा आणि लॉकडाऊन संपेपर्यंत महाराष्ट्रालाच आपलं घर समजा, असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन कालावधी वाढवण्यात आला. याचाही या कामगारांनी निषेध केला आहे. या बिहारी आणि बंगाली परप्रांतीय कामगारांनी आपआपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेगाडी सुरु करण्याची मागणी करत आहेत.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

वांद्र्याच्या जमाव प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अमित शहांचा फोन; म्हणाले…

बाबासाहेबांना वंदन करताना खास करुन भीमसैनिकांना धन्यवाद- उद्वव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

मोदींनी वाढवलेल्या लॉकडाऊनला विरोध, गावी जाण्याच्या हट्टापायी हजारोंची गर्दी

तळारांमांसाठी काहीही! दुधाच्या टँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक

“वॉचमनला जेवण किंवा मोलकरणीलाही धान्य दिले नसेल त्यांनी फुकटच्या सूचना करू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More