कोल्हापूर | मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या जागी असतो तर राजीनामा स्विकारण्याची विनंती पक्षाकडे केली असती, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार म्हणाले आहेत. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी संपूर्ण राज्यभरात, देशभरात फिरुन आपला पक्ष कुठे कमी पडला?, संघटन कमी पडतंय का?, लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहे? याचा अभ्यास केला तर त्याचा फायदा नक्की होईल, असंही रोहित पवार म्हणाले.
लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना अधिक भर दिला जाणार असल्याची शक्यता आहे, असे संकेत रोहित पवार यांनी दिले आहेत.
पार्थ पवार हे नवखे आहेत. खूप अनुभवी असणारेही पराभूत होतात. पार्थच्या पराभवाचा अभ्यास केला जाईल, असंही रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार? अशोक चव्हाण म्हणतात…
-नाशिकच्या शेतकऱ्याचं मोदींना पत्र; म्हणतो गडकरींनाच ‘कृषीमंत्री’ करा
-जेव्हा धोनीच बांगलादेशची फिल्डिंग लावतो…
-बापटांच्या मताधिक्याच्या आकडेवारीवरुन मेधा कुलकर्णींचा गोंधळच गोंधळ!
-काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्या राहुल गांधींच्या घराबाहेर उभ्या राहणार आणि करणार ‘ही’ मागणी
Comments are closed.