Top News महाराष्ट्र मुंबई

‘भाजप यावर थोडं बोलेल का?’; रोहित पवारांचा भाजप नेत्यांना टोला

Photo Credit- Facebook/ Rohit Pawar, Devendra Fadanvis

मुंबई | पूजा चव्हाण प्रकरणावरून भाजप नेते थेट ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आहेत. अशा भाजपला संजय राठोडांवर टीका करण्यासाठी वेळ आहे. मात्र पेट्रोलच्या वाढत्या दरांबाबत भाजप नेते गप्प का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला विचारला आहे. रोहित पवारांनी यासदंर्भात ट्विट केलं आहे.

पेट्रोलने गाठली शंभरी, गॅसचाही उडाला भडका याचा कोण उठवतंय फायदा? कोण मोडतंय केलेला वायदा? याचं सगळ्यांना पडलंय कोडं भाजप बोलेल का यावर थोडं?, असं म्हणतं रोहित पवारांनी भापजला टोला लगावला. तर दुसरीकडे भाजप खासदार महेंद्रसिंग सोलंकी यांनी जर पेट्रोलचे दर वाढत असतील तर त्याच प्रमाणात लोकांचं उत्पन्नही वाढलं असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्यानं होत असलेल्या वाढीचं खापर सोलंकी यांनी 55 वर्षांच्या काँग्रेसच्या राजवटीवर फोडलं आहे.

तेलाच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीनंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. विरोधकांनी सरकारकडे कर कमी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मेघालय सरकारनं राज्यातील जनतेला काहीसा दिलासा देत मागील आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 2 रूपयांनी कमी केलं.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय- अमृता फडणवीस

दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राहिले फक्त एवढे दिवस!

200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धरपकड सुरु; पुण्यातील या कारवाईनं गुंडांचे धाबे दणाणले!

नवीन कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्याच फायद्याचे- नरेंद्र मोदी

आयसीएआयचा ‘सीए’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दणका, वाचा सविस्तर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या