Rohit Pawar | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांवर निशाणा साधत टीका केली होती. शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अण्ण हजारेंना लक्ष्य केलं होतं. त्याला अण्णांनी देखील प्रत्युत्तर दिलं.
आता या सर्व वादावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी अण्णांना स्वयंघोषित गांधी म्हणत टोला लगावला आहे. गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणे योग्य नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
“खरे गांधीवादी असते तर..”
“2014 पूर्वी प्रत्येक विषयांवर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे तथाकथित स्वयंघोषित गांधी 2014 नंतर मात्र देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत असताना आणि लोकशाही शेवटच्या घटका मोजत असतानाही शांतच राहिले नाही तर गायबही झालेत.”, असं रोहित पवार म्हणाले.
तसंच पुढे ते म्हणाले की, “खरे गांधीवादी असते तर संविधानाशी छेडछाडपासून मणिपूर अत्याचार, कुस्तीपटू आंदोलन अशा प्रत्येक प्रकरणावर गप्प न बसता बोलले असते, लढले असते. असो! ज्येष्ठ म्हणून आदर आहेच पण गांधीवादाचा मुखवटा घालून सोयीची आंदोलने करून जनतेच्या भावनांशी खेळणं योग्य नाही”, अशी टीका देखील रोहित पवारांनी (Rohit Pawar) यावेळी केली.
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
“माझ्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा तत्कालीन उपायुक्त जी.आर. खैरनार आणि अण्णा हजारे यांनी केला होता. या आरोपांची चौकशीही झाली. पण, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पुराव्यांनीशी समोर आले होते. माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारे इतरांचे काय झाले?”, असा सवाल शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये केला होता.
अण्णा हजारे यांचं प्रत्युत्तर काय?
“शरद पवार यांना आता 10-12 वर्षांनी जाग आलीये. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही. त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते. कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली”, असं अण्णा हजारे म्हणाले होते. यालाच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलंय.
News Title – Rohit Pawar target Anna Hazare
महत्त्वाच्या बातम्या-
पुणे अपघातप्रकरणी विशाल अग्रवालची धक्कादायक कबुली!
ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंडचा अभिषेक बच्चनबाबत मोठा खुलासा!
“तरूण पिढी नारळ पाणी पिण्यासाठी जाते का?”, वसंत मोरे संतापले