मुंबई| रिपब्लिकन ट्विव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावरुन पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांनावर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, “लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का?, हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावं.”
तसंच फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!’ असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, रोहित पवारांच्या या सवालाला भाजप नेते काय उत्तर देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
पाकिस्तानला हवी भारतीय लस; पुण्यातील सीरमच्या लसीसाठी प्रयत्न सुरु!
उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया- शरद पवार
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर 38 जणांचा लैंगिक अत्याचार
परळीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
कारभारी लयभारी!; …म्हणून पत्नीनं आपल्या पतीला थेट खांद्यावर उचलून घेतलं!