बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, शेंबड्या पोराला समजवतात तसं पडळकरांना समजवा”

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.भाजपच्या मोठ्या नेत्यांनी यांना आवरलं पाहिजेय. आपण काय आहोत मोठ्या नेत्यांवर बोलताना याचा विचार केला पाहिजे यांच कर्तुत्व काय?, असं म्हणत त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केलीये.

सांगली पोलीस स्टेशनमध्ये किती केसेस आहेत ते बघा, त्यांना अराजकीय कार्यक्रम घेता आला असता मात्र त्यांनी फक्त राजकारण केलं. घरातला शेंबडा पोरगा असेल तर मोठी माणसं सांगतात तसं यांना मोठ्या नेत्यांनी सांगितले पाहिजे, असा टोला त्यांनी पडळकरांना लगावलाय.

गेल्या काही दिवसांपूर्वीच चौडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पार पडली. या जयंतीनित्ताने रोहित पवार यांनी यंदा पहिल्यांदाच कार्यक्रम आयोजित केला होता. त्यातच जयंती साजरी करण्यासाठी सालाबादप्रमाणे गोपीचंद पडळकर हे चौंडीत निघाले. मात्र नेमकं यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि वाद सुरू झाला.

तुम्ही पवारांचा नाद करू नका आमचं सगळं ठरलेलं असतं टप्प्यात असल्याशिवाय आम्ही कार्यक्रम करतचं नाही, असे म्हणत प्रवीण दरेकरांना खुलं आव्हान रोहित पवारांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

Monsoon Update: पुढील पाच दिवसात राज्यातील ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“उद्धव ठाकरेंच्या सभेची गर्दी विरोधकांना मोजत बसावी लागेल”

“कोरोनाच्या काळातही भारत थांबला नाही, देशाने आपल्या सुधारणांचा वेग वाढवला”

“…यांचं वागणं बघून हनुमानानेही कपाळावर हात मारून घेतला असेल”

“औरंगाबाद आणि उस्मानाबादची नवी नावं कधीही घोषित होतील”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More