Rohit Pawar | लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. मविआ नेते सध्या वेगवेगळ्या मुद्यावरून महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अशात राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटामधील आमदाराच्या एका ट्वीटने खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत येत्या दोन दिवसांत मोठा खुलासा करणार, असंही ते (Rohit Pawar) म्हणाले आहेत.
रोहित पवारांचे ट्वीट चर्चेत
“गेली दोन अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला.. तसाच विधानसभेतही दिसणार आहे.”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
“आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केले, हे कसे दाखवावे या विवंचनेतून सत्ताधारी आमदारांना येणाऱ्या अधिवेशनात भरीव निधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण निधी देणार कुठून? हा प्रश्न अर्थमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांची फाईल ज्यांच्या सहिने पास होते त्या गृहमंत्र्यांना पडतो की नाही?”, असा संतप्त सवाल देखील रोहित पवार यांनी केलाय.
पुढे त्यांनी लिहिलं की, सरकारच्या याच उधळपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीत निधीचा खडखडाट झाला असून यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाची 20 हजार कोटींची बिले अद्यापही थकीत आहेत. सरकार बिले देत नसल्याने तर राज्यातली बहुतांश कामेही थांबली आहे. अशी माहिती रोहित पवारांनी (Rohit Pawar) ट्वीटद्वारे दिली आहे.
गेली दोन अडीच वर्षे सत्ताधाऱ्यांनी कमिशनखोरी करण्याव्यतिरिक्त कुठेही दिवे लावलेले नाहीत, त्यामुळे जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे आणि हा रोष लोकसभेलाही दिसून आला.. तसाच विधानसभेतही दिसणार आहे.
आता निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केले, हे कसे दाखवावे या… pic.twitter.com/S49WQVw9h4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 24, 2024
“अशी स्थिती असताना आणखी कमिशन खाण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना, आमदारांना खूष करण्यासाठी नवीन कामांना निधी देण्याचा घाट घातला जात आहे का? यासाठी पुन्हा नव्याने हजारो कोटींची कर्जे काढली जातील, हे सरकार पुन्हा सत्तेत तर येणार नाही मात्र जाता जाता राज्याच्या तिजोरीची पूर्णपणे वाट लावून जाईल, हे मात्र नक्की आहे. यासंदर्भात राज्याची तिजोरी कुरतडणारा राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या दोन दिवसात करणार आहे!”, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट आता चर्चेत आलंय.
News Title- Rohit Pawar tweet in discussion
महत्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
पुणे ड्रग्जच्या विळख्यात, सोशल मीडियावर ड्रग्ज तयार करतानाचा व्हिडीओ व्हायरल!
पुण्यात ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
काळजी घ्या! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
पार्किंगमध्ये कार जास्त वेळ पार्क करताय? तर होऊ शकतं मोठं नुकसान