Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपने निवडणुकीच्या तोंडावर आपल्यासोबत घेतलं. अजितदादांमुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा भाजपचा भ्रम होता. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांनी महायुतीविरोधात मतदान केलं. राज्यात महाविकास आघाडीच्या 30 तर महायुतीच्या 17 जागांवर विजय मिळवला. यामुळे आता अजितदादा बळीचा बकरा झाले असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.
यावेळी रोहित पवार (Rohit Pawar) बोलत असताना त्यांनी अजितदादांसह भाजपवर देखील टीका केली आहे. दादांना भाजपपासून वेगळं करण्याची रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडल्याची चर्चा आहे. भाजपचा पराभव हा चुकीच्या धोरणांमुळे झाला आहे, असंही रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत. त्यांनी ट्विट करत भाजप आणि अजितदादांना सुनावलं आहे.
रोहित पवारांचं ट्विट चर्चेत
मविआच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आरएसएसच्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे.
#मविआ च्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या #चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 19, 2024
“भाजपचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही”
मुळात भाजपचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही तर भाजपच्याच शेतकरी, युवा विरोधी धोरणांमुळे झालेला आहे. भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे, जनतेला गृहीत धरून चालण्याच्या वृत्तीमुळे, पक्ष फोडण्याच्या कृत्यांमुळे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजितदादांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही, असं रोहित पवारांनी म्हटलंय.
शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या, मराठी स्वाभिमानी गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, याची दखल चाणक्यांनी घ्यायला हवी, असं ट्विट रोहित पवारांनी (Rohit Pawar) केलं आहे.
News Title – Rohit Pawar Tweet On Ajit Pawar News Update
महत्त्वाच्या बातम्या
प्रसाद देठेंची सुसाईड नोट चर्चेत; पंकजा मुंडेंचंही घेतलं नाव
’24 तास काम करून लेकरांचं भागत नाही…’; मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं
युगेंद्र पवार बारामतीचे नवे ‘दादा’?, अखेर सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर
“…राज्य सरकार कसं हातात येत नाही तेच बघतो”; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकारणात खळबळ