रोहित पवार यांच्या एका ट्विटने पोलीस प्रशासन हललं, हजारो विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

Rohit Pawar: राज्यातील पोलीस भरती (Police Bharti) आणि एसआरपीएफ भरतीसंदर्भातील एका निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार होता, मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या एका ट्विटमुळे प्रशासन खडबडून जागं झालं आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने याबद्दल आता निवेदन जारी केलं आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये एकाच उमेदवाराने अनेक पदांसाठी अर्ज भरलेले आहेत, मात्र या उमेदवारांना दोन वेगवेगळ्या पदांसाठी एकाच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मैदानी चाचणी आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दोन्ही मैदानी चाचण्यांच्या ठिकाणांमधील अंतर सुद्धा जास्त होते.

रोहित पवार यांचे ट्विट-

 

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यासदंर्भातील वस्तुस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली. एक विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच दिवशी किंवा लगेचच दुसऱ्या दिवशी मैदानी चाचणीला उपस्थित राहू शकत नाही. अखेर पोलीस दलाने या प्रकाराची दखल घेतली आणि एक निवेदन जाहीर केलं आहे.

पोलिस दलाने घेतली दखल-

 

राज्य पोलीस दलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानूसार आता पहिल्या आणि दुसऱ्या मैदानी चाचणीमध्ये चार दिवसांची सूट उमेदवाराला देण्यात आली आहे. पहिली मैदानी चाचणी झाल्यानंतर चार दिवसांनी संबंधित उमेदवार दुसऱ्या मैदानी चाचणीला उपस्थित राहू शकतो, त्यासाठी त्याला पहिल्या मैदानी चाचणीला उपस्थित राहिल्याने पुरावे सोबत द्यावे लागतील, ही अट घालण्यात आली आहे.

News Title: Rohit Pawar on Police Recruitment

महत्त्वाच्या बातम्या-

“दलित बुद्धांनो आता तरी शहाणे व्हा!”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महिलांच्या ‘या’ सवयींमुळे पतीचं आयुष्य होतं बरबाद!

“तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर…”; आदित्य ठाकरेंना ‘या’ नेत्याचं खुलं आव्हान

आत्महत्या केलेल्या समर्थकाच्या अंत्यविधीवेळी पंकजा मुंडे ढसा ढसा रडल्या!

“..तर उद्धव ठाकरेंना कोकणात पाय ठेऊ देणार नाही”; राणेंचा इशारा