Top News महाराष्ट्र मुंबई

“रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे नक्की वाचा”

मुंबई | मोदी सरकारने आणलेल्या कृषि कायद्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. स्वतः शरद पवार यांनी यासंदर्भात विरोधाची भूमिका घेतली आहे. अशा पार्श्वभूमीवर बारामती अॅग्रो कंपनीच्या करार शेतीचे बॅनर व्हायरल झाल्यानं रोहित पवार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.

भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवार यांना याच मुद्द्यावरुन धारेवर धरलं आहे. त्यांनी बारामती अॅग्रोच्या करार शेतीचे फोटो ट्विट केले आहेत आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपनं या मुद्द्यावरुन पवार कुटुंबियांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील या मुद्द्यावरुन पवारांवर टीकेची झोड उठवली आहे.

 

 थोडक्यात बातम्या-

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; शिवसेना नेत्यानं शरद पवारांच्या विरोधात दंड थोपटले!

“पुरंदरमधील विमानतळ बारामतीला पळवण्याचा शरद पवारांचा डाव”

“शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्यांनो… हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे”

पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

राहुल गांधींनी शिवसेनेला जागा दाखवली- अतुल भातखळकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या