पुणे | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकादा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. मात्र सरकारने मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला राज्यभरातून मराठा बांधावाकडून आणि राजकीय नेत्यांकडून मोठा पाठींबा मिळत आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही त्यांच्या उपोषाणाला पाठिंबा दिला आहे. ते एक दिवसाचा अन्नत्याग करणार आहेत.
तरुणांच्या प्रश्नावर रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरु आहे. काल त्यांची ही यात्रा पुण्यातील सणसवाडीमध्ये पोहोचली. त्यावेळी त्यांनी एक दिवस अन्नत्याग करणार असल्याची घोषणा केली. रोहित पवार म्हणाले, आज जरांगे पाटील पुन्हा उपोषणासाठी बसत आहेत. संघर्ष यात्रा युवकांच्या हिताची आहे. युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. अशा परीस्थीत एक सामाजिक कार्यकर्ता उपोषण करत असेल, लढत असेल तर सरकारने पुढाकार घ्यावा. 50 टक्क्याची मर्यादा ओलांडावी लागेल, असं ते म्हणालेत.
तुम्ही काही महीन्यापूर्वी ईडब्लूएस आरक्षणासाठी घटना दरुस्ती करु शकता तर, मराठा आणि धनगर आरक्षणासाठी ही मर्यदा का ओलांडू शकत नाही? मराठा समाजाला 16 टक्केपेक्षा आधिकचे आरक्षण का देऊ शकत नाहीत?, असे प्रश्न उपस्थीत करत कोर्टात टिकणारं आणि कोणी अव्हान देऊ शकणार नाही, असं आरक्षण दिलं पाहीजे असं त्यांनी सांगितलं.
आम्हाला दररोज 18 किमी चालायचं आहे. एक सामाजिक कार्यकर्ता उपोषणाला बसत आहे. त्यांनी तो निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी उद्या संपूर्ण दिवस अन्न त्याग करणार आहे. उद्या दिवसभर चालत असताना, अन्नाचा एक कणही सेवन करणार नाही. ज्यावेळी समाजाचे आणि लोकांचे असे मुद्दे येत असतात, त्यावेळी एकत्र यावं लागतं. ऐकमेकांची काळजी घ्यावी लागते, असं रोहीत पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या