करमाळा | करमाळा तालुक्यातील केडगाव शिवारात ऊसतोड मजुराच्या मुलीचा बिबट्याने जीव घेतल्यानंतर गावात दहशतीचं वातावरण आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभाग अथक अपयशी ठरलंय.
तर येत्या 2 दिवसांमध्ये बिबट्याला पकडण्याचा निर्धार वन विभागाच्या अधिकार्यांनी केलाय. दरम्यान आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलंय. रोहित पवार यांनी बॅटरी व काठी घेऊन वनअधिकारी यांच्या बरोबर पाहणी केलीये.
यावेळी, बिबट्याचं संकट टाळण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राणाची शिकस्त करून हा बिबट्या जेरबंद करावा अशा सूचना रोहित पवारांनी दिल्यात.
करमाळा तालुक्यातील वांगी सांगवी याठिकाणी रोहित पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसंच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी करत असलेल्या कामाची माहिती घेतली.
थोडक्यात बातम्या-
गुगल आणि अॅमेझॉनला मोठा झटका; भरावा लागणार 16 कोटी डॉलर्सचा दंड
मुंबईत डिसेंबरच्या थंडीमध्ये पावसाची हजेरी
गांधी कुटुंंबाने आता काँग्रेस सोडावी- रामचंद्र गुहा
देशातील अॅलोपथी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन
…तर मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू-पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल