महाराष्ट्र मुंबई

रोहित पवारांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र; केली ‘ही’ विनंती

मुंबई | MPSC परीक्षेच्या खुल्या वर्गासाठीची कमाल मर्यादेची अट रद्द करावी आणि SEBC चा दावा केलेल्या उमेदवारांनी खुला किंवा EWC यापैकी एकच प्रवर्ग निवडावा, या आशयाचं MPSC ने काढलेलं परिपत्रक मागे घ्यावं, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिलं आहे.

कमाल संधीची अट घातल्याने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे कमाल संधीची अट तात्काळ मागे घेणे गरजेचं आह, असं रोहित पवार म्हणालेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 4 जानेवारी 2019 रोजी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात देखील प्रसिद्धीपत्रक जारी केलेले आहे. या पत्रकानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांनी खुला अथवा दृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गापैकी कुठलाही एक प्रवर्ग निवडण्यास सांगण्यात आलेले आहे. यासाठी 5 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 पर्यंतचा कालावधी दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा प्रवर्ग निवडल्यास नंतरच्या काळात संबंधित उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ घेता येणार नसल्याचं स्पष्ट म्हटलं आहे.

मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, येत्या 25 जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू होणार आहे. अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा समाजाच्या उमेदवारांमध्ये मोठी गोंधळाची स्थिती आणि भविष्यातील भविष्याबद्दल भीती वाटत आहे, असं रोहित पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

 थोडक्यात बातम्या-

…तर राज्य सरकार गरिबांना मोफत लस देणार- राजेश टाेपे

…तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे- गिरीश महाजन

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

पाटलांच्या गावात सोयीची आघाडी! भाजपची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी

कौतुकास्पद! अंधत्वावर मात करत लताने केलं कळसूबाई शिखर सर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या