बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ताई सगळ्यांनाच खाऊ घालतात, राष्ट्रवादीला मात्र…”, भर कार्यक्रमात रोहित पवारांचा पंकजांना टोला

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde)  नुकत्याचं झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात दिसल्या होत्या. यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, (Rohit Pawar) काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) हे देखील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी नाव न घेता अनेक टोमणे मारले आहेत.

कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना चिकनचा रस्सा बनविण्याचा टास्क दिला होता. मात्र, चिकन बनविण्यासाठी लागणारं सामान घेताना पंकजा मुंडे नेमकं खोबरं आणण्याचं विसरल्या. त्यामुळे कार्यक्रमाच्या फॉर्मटनुसार पंकजा यांना शिक्षा मिळाली. तेव्हा त्यांनी मला नेहमीचं ‘मी न केलेल्याची शिक्षा मिळते,’ असा टोमणा लगावला. नेमकं त्यांनी हा टोला कोणाला लगावला हे मात्र समजलं नाही.

रोहित पवार यांनीही यावेळी चागंल्याच कोपरखळ्या मारल्या आहेत. ‘ताई सगळ्यांनाचं खाऊ घालतात, काँग्रेस झालं, राष्ट्रवादीलाही कधीतरी आमंत्रण द्या, असा चिमटा त्यांनी काढला. त्यावर पंकजा मुंडेनी ‘मी तुम्हाला आमत्रंण द्यायला तयार आहे. तुम्हाला जे आवडतं. ते खायला घालायची कला माझ्याकडे आहे,’ असा प्रतिटोला लगावला आहे.

दरम्यान, कार्यक्रमात पुढे पंकजा यांना टास्कसाठी मदतीची गरज पडली होती. त्यावेळी पंकजा यांनी रोहित पवारांना बाहेरून पाठिंबा चालेल ना रोहित असा मिश्किल प्रश्न विचारला. त्यावर रोहित पवारांनीही आताचं सेशन बघितल्यानंतर भाजपचा बाहेरून पाठिंबा असल्यासारखं वाटतंय, असा टोला लगावला.

थोडक्यात बातम्या-

‘माई, तुझ्या प्रेमाला…’, गुगलनं अनोख्या पद्धतीनं वाहिली श्रद्धांजली

“मोदीजी, भारतात असुरक्षित वाटत असेल तर पाकिस्तानात जा”

महत्त्वाची बातमी! ‘या’ कारणामुळे आजपासून काही दिवस CNG राहणार बंद

लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची ‘ही’ लक्षणं आढळल्यावर वेळीच व्हा सावध!

‘दुसऱ्या लाटेच्या तुलनेत सध्या…,’ निती आयोगाचा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More