मुंबई | सध्या सोलापूरातील(Solapur) लोकसभेच्या जागेबाबत राजकारणात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये हा संघर्ष झाल्याचं पहायला मिळतंय. आमदार रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी एक वक्तव्य केलं.
कोण रोहित पवार? रोहित पवार पहिल्यांदा आमदार झाल्यामुळे हा पोरकटपणा करत आहेत असं वक्तव्य केलं होत. प्रणिती शिंदेंच्या (Praniti Shinde) या वक्तव्यानंतर रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. प्रणिती शिंदेंच्या याच वक्तव्याला रोहित पवारांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे.
आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरुन नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करत आहेत, पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आपापसात वाद न करता बेरोजगारी (Unemployment) हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करुया .
हे ट्विट करत पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, हा वाद रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झाला होता. सोलापूरच्या लोकसभा राखीव मतदारसंघाच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेना दोनवेळा पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे अगामी निवडणुकीत ही जागा काँग्रेसनं (Congress) राष्ट्रवादीला द्यावी अशी मागणी पवारांनी केली होती. यामुळे वाद निर्माण झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या