बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक?’; ठाकरे सरकारला घरचा आहेर

मुंबई | राज्यात मागील तीन ते चार वर्षापासून विद्यार्थ्यांची नोकरभरती झाली नाही. मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे नोकरभरती पुढं ढकलण्यात आली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड ची भरती परीक्षा अनेक दिवसांनंतर आज 25 सप्टेंबर आणि उद्या 26 सप्टेंबरला होणार होत्या. अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रात त्रुटी असल्याने आणि काही विद्यार्थ्याचे तर उत्तर प्रदेशमध्ये परीक्षा केंद्र आलं होतं, त्यानंतर काल रात्री राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज आणि उद्या होणारी परीक्षा पुढं ढकलली आहे. त्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

राष्ट्रावादीचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्य विभागाची परीक्षा पुढं ढकलल्यामुळं सरकारला सुचना करत घरचा आहेर दिला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली. आपल्या सरकारने आरोग्य भरती सुरू केली पण गोंधळांचं वातावरण दिसतंय. असंच चालुच राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभार्याने विचार करायला हवा, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, परीक्षा सुरळीत होणं आवश्यक होतं. अनेकांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. परीक्षेला जाण्यासाठी त्यांनी उसने तर काहींनी व्याजाने पैसे आणले, परंतु आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळं पुन्हा लवकर परीक्षा घ्यावी आणि त्यावेळी एसटी मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का? याचा विचार व्हावा, असं पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, तसंच पारदर्शकासाठी जेष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या देखरेखीत परीक्षा घेण्याबाबत विचार व्हावा, तसेच सर्व विद्यार्थ्यांना समान शुल्क आकारली जावी, अशा सुचना रोहित पवार यांनी राज्य सरकारला केल्या आहेत.

वाचा ट्विट – 

थोडक्यात बातम्या –

मी जेलमध्ये असताना ‘त्यांनी’ माझा जीव वाचवला – छगन भुजबळ

काँग्रेस नेते टीएस सिंहदेव म्हणाले, ‘पंजाबमध्ये बदल होऊ शकतो तर…’

“त्यांची आडनावं पवार, थोरात आणि ठाकरे असती तर असं केलं असतं का?”

‘…म्हणून परीक्षा रद्द करण्यात आल्या’; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून उघडणार चित्रपटगृहे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More