बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार रोहित पवारांचा ‘झिंगाट डान्स’, कोरोना रूग्णांसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ

अहमदनगर | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघामधील गायकरवाडी येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. त्या कोविड सेंटरमध्ये आज शेकडो रूग्णांवर उपचार केले जात आहे. काही दिवसांपुर्वी या रूग्णालयात कोरोना रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचा यशस्वी वापर केला गेला. रूग्णांना मानसिक आधार मिळावा यासाठी ही पद्धत वापरण्यात आली आहे. याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांचा डान्स करताना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

‘गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो’, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. या ट्विट सोबत त्यांनी व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी रविवारी जामखेडमध्ये आरोळे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती. तसंच यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टरांसोबत बैठक घेऊन कोविडची परिस्थिती, उपलब्ध औषधे, बेड, रुग्णांचं प्रमाण याबाबतचा आढावा घेतला होता. त्यादरम्यान त्यांना कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यासोबत सैराट चित्रपटातील झिंगाट या गाण्यावर ठेका धरला.

दरम्यान, या कोविड सेंटरमध्ये लहान मुलांपासून वृद्ध लोकांचे उपचार चालू आहेत. झिंगाटवर एक आजीबाई नाचताना दिसताच रोहित पवार देखील थिरकताना दिसले. त्यानंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्यांच्यासोबत नाचू लागले.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

लॉकडाऊनमध्ये दुकान सुरू ठेवल्याने महिला जिल्हाधिकाऱ्यांची मुजोरी, पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लहान मुलांना होतोय कोरोनाचा संसर्ग; तब्बल 166 मुलं कोरोनाबाधित

टुलकिट प्रकरणाला नवं वळण; दिल्ली पोलिसांची ट्विटर इंडियाला नोटीस

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात एका दिवसात आढळले फक्त 94 कोरोनाबाधित रुग्ण

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More