रोहित शर्माकडून वेस्ट इंडिज संघाचा 9 धावांनी पराभव

मुंबई | भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा अक्षरशः धुव्वा उडवत 224 धावांनी विजय साजरा केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एकट्या रोहित शर्माने केलेली धावसंख्या देखील संपूर्ण वेस्ट इंडिज संघाला गाठता आली नाही.

रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांच्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने विंडीजपुढे 378 धावांचं आव्हान उभारलं होतं. या आव्हानापुढे विंडीजचा डाव अवघ्या 153 धावांमध्ये संपुष्टात आला. 

या विजयासह 5 वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. तर एक वनडे टाय झाली होती. 

दरम्यान, विंडीजच्या पराभवानंतर सोशल मीडियात एक पोस्ट जोरदार व्हायरल झाली आहे. एकट्या रोहित शर्माने विंडीजचा पराभव केला, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सचिनने धावा किती काढल्या आणि किती मॅचफिक्सिंग केले? राजू शेट्टी

-सचिन तेंडुलकरलाही जमलं नाही ते रोहित शर्मानं करुन दाखवलं!

– शिवसेना आक्रमक; मुताऱ्यांना दिलं ‘अजित मुत्रालय’ नाव

-…तर अजित पवारांना ताफ्यासह जाळू; शिवसेेनेचा इशारा

-सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय; धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या