Top News खेळ

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निवडीबाबत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला…

नवी दिल्ली | ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीममध्ये सुरुवातीला रोहित शर्माची निवड न केल्याने मोठा वादंग माजला होता. यानंतर सोशल मिडीयावर बीसीसीआय तसंच विराट कोहलीवर टीका देखील करण्यात आली. मात्र याबाबत आता खुद्द रोहित शर्माने खुलासा केला आहे.

जवळपास महिन्याभरानंतर रोहित शर्माने याबाबत मौन सोडलं असून वनडे आणि टी-20 सामन्यासाठी आपली निवड न होण्यामागील कारण स्पष्ट केलंय.

रोहित शर्मा म्हणाला, “ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात 11 दिवसांमध्ये सहा मर्यादित ओव्हरचे सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळेच मी न खेळण्याचा निर्णय घेतला. रिहॅबिलीटेशनसाठी मला साडेतीन आठवडे लागणार आहेत. जर मी दुखापत सावरण्यास वेळ दिला, तर कदाचित कसोटी सामने खेळू शकेन, अशी आशा होती.”

तो पुढे म्हणाला, “दुखापतीनंतर आयपीएलच्या पुढील सामन्यांत खेळावे की खेळू नये याबाबत ठरवलं. ऑस्ट्रेलियात खेळण्याविषयी कोण काय म्हणत होतं हे माझ्यासाठी अजिबात महत्त्वाचं नव्हतं.”

महत्वाच्या बातम्या-

‘या’ व्यक्तीसोबत रोहित पवारांना लाँग ड्राईव्हला जायला आवडेल!

मुंबईकरांनो सावधान! कोरोनाच्या रूग्णांमध्ये गेल्या 4 दिवसांत लक्षणीय वाढ

महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोनाचं राजकारण करतायत; संजय राऊत यांची टीका

भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्वप्नातच ठरवावा; अनिल परब यांचा आशिष शेलारांना टोला

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, शॉकसाठी तयार रहा; मनसेचा सरकारला इशारा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या