Rohit Sharma | टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी20 विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यानंतर विराट, रोहित आणि जडेजाने टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे विराट, रोहित आणि रवींद्र जडेजा टी20 फॉरमॅटमध्ये श्रीलंकेविरोधात खेळणार नाहीत. यामुळे आता रोहित शर्माऐवजी टी20 साठी टीम इंडियाचं कर्णधारपद कोणाकडे जाणार हे पाहणं गरजेचं आहे.
रोहितला वनडे सीरिजचाच एकमेव पर्याय
नुकताच झिम्बाब्वे विरूद्ध टीम इंडिया या दोन्ही संघात टी20 मालिका पार पडली. या सामन्यात टीम इंडियाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. त्यानंतर आता आगामी टी 20 मालिका ही श्रीलंका विरूद्ध टीम इंडिया यांच्यात होणार आहे. या दौऱ्यात टी 20 आणि वनडे सीरिज होणार आहे. रोहितसाठी या दौऱ्यात वनडे सीरिजचाच एकमेव पर्याय आहे. कारण टी20 मधून रोहितने निवृत्ती घेतली. अशातच आता रोहित शर्मा (Rohit Sharma) हा श्रीलंकोविरोधात वनडे मालिकेत खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार, रोहित शर्मा (Rohit Sharma) श्रीलंका विरूद्ध वनडे मालिकेसाठी खेळणार आहे. निवड समिती लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघाची निवड करणार आहे. जर रोहित वनडे खेळणार असेल तर त्यालाच नेतृत्वाची जबाबदारी मिळणार आहे. गौतम गंभीर हा हेड कोच म्हणून धुरा सांभाळणार आहे. गंभीरने श्रीलंकेविरोधात वरीष्ठ खेळाडूंनी खेळण्यासाठी सांगितलं. अशातच टीम इंडियामध्ये के.एल राहुल आणि श्रेयश अय्यर यांचं कमबॅक होऊ शकतं. याचसोबत रोहित शर्माबाबत (Rohit Sharma) मोठी अपडेट समोर आली.
Rohit Sharma may make himself available for the ODI series against Sri Lanka. [Cricbuzz] pic.twitter.com/3DimibvIB3
— Johns. (@CricCrazyJohns) July 17, 2024
विराट आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती
रोहित शर्मा वनडे मालिकेत खेळेल अशी चर्चा आहे. तसेच विराट आणि टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. येत्या फेब्रुवारी मध्ये पाकिस्तान या देशात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे विराट आणि बुमराहला वनडे मालिकांमध्ये विश्रांती दिली जाणार आहे. टीम इंडिया विरूद्ध श्रीलंकेत 27 जुलैपासून टी 20 मालिकेला सुरूवात होणार आहे. 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
रोहितच्या निवृत्तीनंतर आता टी 20 टीम इंडियाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवचं नाव चर्चेत आहे. हार्दिक पांड्याच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. मात्र सूर्यकुमार यादव हा कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार असल्याची चर्चा आहे.
News Title – Rohit Sharma Big Update About One Day Match IND Vs SRL Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
पावसाळ्यात डेंग्यूचा धोका अधिक, पालकांनो आपल्या मुलांचं ‘असं’ करा संरक्षण!
शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर राज्यातील मतदारांना भाजपचा ‘हा’ नेता मुख्यमंत्री पाहायचाय!
पुढील 5 दिवस ‘या’ भागात जोरदार पाऊस बरसणार; ऑरेंज अलर्ट जारी
अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?, शरद पवार म्हणाले…
निलेश लंकेंचं टेंशन वाढणार?, सुजय विखेंची ‘ती’ मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य