विजयानंतर रोहित शर्माची मोठी घोषणा, चाहत्यांची वाढली धाकधूक

Rohit Sharma Clears Retirement Rumors After Champions Trophy Win

Rohit Sharma | चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) निवृत्ती घेणार का, या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, विजेतेपद मिळवून दिल्यानंतर रोहितने स्पष्ट केलं आहे की, तो सध्या वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मोठी घोषणा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्या आयसीसी ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर, आता टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली.

भारताच्या विजयानंतर रोहित निवृत्तीची घोषणा करणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, या सर्व चर्चांना रोहितने स्वतः उत्तर दिलं आहे.

प्रेस कॉन्फरन्सदरम्यान रोहितने स्पष्ट केलं, “अजून एक शेवटची गोष्ट… मी या फॉर्मेटमधून निवृत्त होत नाहीय. पुढे कुठल्याही अफवा पसरू नयेत म्हणून स्पष्ट करतोय.” त्याच्या या वक्तव्यामुळे भारतीय चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचे रोहितचे स्वप्न

रोहित शर्माने(Rohit Sharma) याआधीच संकेत दिले होते की, तो 2027 वनडे वर्ल्ड कप खेळण्याचा विचार करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार खेळ केला होता, मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही.

Title : Rohit Sharma Clears Retirement Rumors After Champions Trophy Win

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .